‘अमृतदिप’ तर्फे स्थलांतरीत कामगारांमधे गुप्तरोग, एच.आय.व्ही/एडस् बद्दल जनजागृती व तपासणी
Monday To Monday NewsNetwork।
अहमदनगर (शुभांगी माने)।अहमदनगर शहरातील व एम.आय.डी.सी परिसरातील स्थलांतरीत कामगारांचे आरोग्य जपण्याच्या हेतुने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘अमृतदिप’ प्रकल्पाच्या वतीने जुन महिन्यात सलग ९ दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली होती. गुप्तरोग,एच.आय.व्ही/ एडस्, टी.बी. आणि कोविड या आजारांबद्दल चर्चा सत्र, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन च्या माध्यमातून कोविड नियमांचे पालन करीत जनजागृती करण्यात आली.
यावेळी काटवन खंडोबा परिसर, नेप्ती परिसर, तपोवन रोड, पाईपलाईन रोड, एम.आय.डी.सी परिसरातील कंपनी, हॉटेल, बांधकामगार या स्थलांतरीत कामगारांची गुप्तरोग, एच.आय.व्ही ची तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबीरामध्ये एकुण ३६२ कामगार उपस्थित होते त्यापैकी २६५ कामगारांची एच.आय.व्ही तपासणी झाली त्याचबरोबर डी.आय.सी क्लिनिक, वैयक्तिक समुपदेशन यासाठी ९२५ कामगारांनी नावे नोंदवली.
या आरोग्य शिबीरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सर्व उपस्थित कामगारांच्या आरोग्य तपासणी केली. प्रकल्पाच्या समुपदेशिका पल्लवी हिवाळे-तुपे आणि जिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशिका सविता बेल्हेकर यांनी समुपदेशन सत्र घेवून कामगारांमधील एच.आय.व्ही /एडस्, गुप्तरोग , टी.बी बद्दल असलेले गैरसमज दुर केले. स्थलांतरीत कामगारांचे आरोग्य जपणे काळाची गरज आहे असे अमृतदिप प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक शुभांगी माने यांनी जनजागृतीवेळी म्हटले. आरोग्य शिबीरे यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे व्यवस्थापक शुभांगी माने यांच्या मार्गदर्शनाने लेखाधिकारी श्रीकांत शिरसाठ, क्षेत्रिय अधिकारी ऋतिक बर्डे, मच्छिंद्र दुधवडे आणि सी एस.आर.डी महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी अनिकेत जगताप व राजू मल्लिक,शितल पाटोळे,अमोल राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.