भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांसाठी अमृतदिप प्रकल्पाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

अहमदनगर, शुभांगी माने । अहमदनगर जिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अमृतदिप प्रकल्पाच्या वतीने समुपदेशन आणि आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. प्रकल्प व्यवस्थापक, समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, जिल्हा रुग्णालयातील तज्ञ मार्गदर्शक अशी टीम उपस्थित राहून सेवा पुरवतात. आपली उपजिविका भागविण्यासाठी कामगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असतात. या स्थलांतर काळादरम्यान त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, भुकेच्या प्रश्नाबरोबरच गंभीर आरोग्याची समस्या उद्भवू नये या विचारातून दि २४/०८/२०२१ रोजी सोलापूर रोड , केडगाव भागात रस्त्याच्या कडेला झोपड्या बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या १५० कामगारांसाठी कोव्हिड नियम पाळत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरादरम्यान समुपदेशन, गुपतरोग,टी. बी एच. आय. व्ही / एड्स अशाप्रकारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरादरम्यान असे दिसून आले की, हातावरचे पोट असलेले कामगार स्वत:चे दुखणे अंगावर काढतात,खर्चामुळे दवाखान्यात जाणे टाळतात यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. अमृतदिप टीमने कामगारांच्या आरोग्य संदर्भात घेतलेली दखल स्थलांतरित कामगारांसाठी अतिशय महत्वाची ठरली अशी कामगारांकडून प्रतिक्रिया मिळाली. स्थलांतरित कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ. सुरेश घोलप, शुभांगी माने, पल्लवी हिवाळे-तूपे, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डॆ, अनिल दूधवडे, प्रसाद माळी यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!