अमृतदिप प्रकल्पा अंतर्गत स्थलांतरित कामगारांच्या आरोग्य तपासण्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अहमदनगर,शुभांगी माने । श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अमृतदिप लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्पअंतर्गत पोटाची खळगी भरण्यासाठी अहमदनगरमधील वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी वेळोवेळी आरोग्याच्या महत्वपूर्ण तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये एच.आय.व्ही/एड्स,गुप्तरोग,टीबी ,तपासणी केली जाते इतकेच नव्हे तर कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न जाणुन घेऊन त्यावर तोडगा देखील काढला जातो.
अमृतदिप प्रकल्पाअंतर्गत हॉटेल ,कंपन्या,बांधकाम साईट, ,पाले ठोकुन राहणारे मजुर अशा विविध ठिकाणी काम करणा-या स्थलांतरित कामगारांसाठी महिन्यातून साधारण २० कॅम्प होत असतात आणि त्यामध्ये १००० च्या पुढे कामगार उपस्थित असतात.कामगारांना मध्यभागी ठेवुन सुरू असलेले अमृतदिपचे आरोग्य सेवेचे कार्य कामगारांना भविष्यातील गंभीर आजारांविषयी वेळीच जागृत करीत आहे व पिडीतांना सुसहाय्य जीवन जगण्यासाठी उपचाराचे सोयीस्कर मार्ग ऊपलब्ध करून देत आहे. कामरगाव येथील हॉटेल राजस्वी आणि हॉटेल महाज्योत याठिकाणी कामगांचे नव्याने वास्तव्य झालेले निदर्शनास येताच त्यांच्या आरोग्याकरिता अमतदिपने महत्वपूर्ण पाऊल उचलले. काम तर महत्वाचे आहेच परंतु त्याहुनही आरोग्य जास्त महत्वाच आहे हे कामगारांना पटवुन देणे सुरूवातीला अवघड गेले पण अमृतदिप टीमने अतिशय सोप्या भाषेत अगदी मोकळी चर्चा केली तेंव्हा आरोग्य शिबीरासाठी कामगार मोठ्या संख्येने उपसाथित राहिले आणि सर्वांनी एच.आय.व्ही /एड्स,गुप्तरोग,टीबी ,सोबतच हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी तपासणी करून घेतली.
त्यानंतर हॉटेल मालकांनी अभिप्राय मध्ये सांगितले की अशा आरोग्य शिबीरांची कामगारांना जास्त गरज आहे कारण अशा विषयांवर लोक चर्चा करणे टाळातात आणि चर्चेत न आलेल्या विषयांची जागृती कामगारांमध्ये कमीच असते आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी न घेतल्याने एक दिवस गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. सर्व कमगार आणि मालक यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पडले.आरोग्य शिबीर आयोजनासाठी क्षेञीय अधिकारी प्रसाद माळी, ऋतिक बर्डे, अनिल दुधवडे मच्छिंद्र दुधवडे, समुपदेशक सौ.पल्लवी तुपे, हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी चे लॅब टेक्निशियन श्री. संजय दहिवाळ, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर, वाय आर जी केअर टेक्निशियन श्री.सुनिल ढलपे.या करमचा-यांनी अथक परिश्रम घेतले. असे प्रकल्प व्यवस्थापक शुभांगी माने यांनी कळविले आहे.