जागतिक एड्स दिनानिमित्त अमृतदिप प्रकल्पा अंतर्गत अमृतथ रिक्षा रॅलीचे आयोजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अहमदनगर,मंडे टू मंडे प्रतिनिधी,शुभांगी माने। १ डिसेंबर २०२१ जागतिक एड्स दिनानिमित्त श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ संचलित अमृतदिप प्रकल्पा अंतर्गत अहमदनगरमध्ये आज १२ ते ५ या वेळेत अमृतथ रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रिक्षा रॅलीचे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंञण विभाग अधिकारी मा.शिवाजी जाधव सर यांच्या हस्ते रिक्षा रॅलीचे उद्घाटन झाले.
यामध्ये असमानता संपवा,एड्स संपवा,महामारी संपवा ही एड्स दिवसाची थीम घेऊन अहमदनगर येथील विविध भागामध्ये ” एड्स दिवस का नारा , एड्स मुक्त हो विश्व सारा आशा विविध घोषणा,चारोळ्या,गाणी ऑडिओ क्लिप याद्वारे जनजागृती रिक्षा रॅली सह्याद्री चौक, गजानन कॉलनी, नागापुर एम.आय.डीसी, नागापुर, बोल्हेगाव फाटा,प्रेमदान चौक,झोपडी कॅन्टीन,सावेडी, दिल्ली गेट, गांधी मैदान,माळीवाडा बस स्टॉप भागामध्ये फिरविण्यात आली.जागो जागी थांबुन स्थलांतरित कामगार,दुकान मालक, हॉटेल कामगार,बांधकामगार,फेरीवाले, स्थानिक नागरिक सर्वांना एच आय व्ही/एड्स/टीबी/गुप्तरोग याबद्दल माहिती देण्यात आली.जिल्हा रूग्णालय, आय.सी.टी.सी.DAPCU न्यु आर्य कॉलेज अहमदनगर विद्यार्थी शिक्षक ,स्नेहज्योत, चाईल्ड लाईन यांनी विशेष सहभाग नोंदवला.