अहमदाबाद विमान अपघातील मृतांची संख्या २७५ च्या वर
अहमदाबाद, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अहमदाबाद विमान अपघातील मृतांची संख्या आता पर्यंत २७५ झाली आहे. विशेष म्हणजे या विमान अपघातातून २४२ पैकी केवळ आणि केवळ एकच केवळ एकच प्रवासी बचावला आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या विमानात २४२ प्रवासी होते त्या पैकी २ वैमानिक आणि १० कर्मचारी, १६९ प्रवासी भारतीय होते, ५३ ब्रिटिश नागरिक होते,१ व्यक्ती कॅनेडियन होता, तर ७ पोर्तुगालचे नागरिक होते.
अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताच्या वेळी, विमान कोसळलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीत ६० हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी आणि काही इतर लोक उपस्थित होते. यापैकी ३४ जणांचा मृत्यू झाला असून आजअखेर मृतांची संख्या २७५ झाली असून विमानातील २४१ प्रवाशांसह ३४ वैद्यकीय महाविद्यालयातील लोकांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे विमान अपघातातून केवळ एकच प्रवासी बचावला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता पर्यंत २७० हून अधिक मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याशिवाय २२० जणांचे डीएनए सॅम्पलिंग करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी शुक्रवार रोजी अहमदाबादला पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी घटनेच्या ठिकाणाला भेट दिली. त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे त्यांनी सुमारे १० मिनिटे पीडितांची भेट घेतली. विमान अपघाताची चौकशी ८ एजन्सी करत आहेत, ज्यात राष्ट्रीय तपास संस्था, गुजरात पोलिस, विमान अपघात तपास ब्युरो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा, युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश आहे. त्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले

