ऐनपुर- सुलवाडी-कोळदा रस्त्याचे काम निकृष्ट,रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,प्रतिनिधी। ऐनपूर ते सुलावाडी कोळदा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजने अंतर्गत सुरू असून रस्त्याची लांबी ५ किमी असून त्याची किंमत २ कोटी ८६ लाख आहे. ऐनपूर कोळदा रस्ता हा खूप रहदारीचा असल्यामुळे रस्त्याची रुंदी फक्त ३ मी असल्यामुळे रहदारीला अळथडा निर्माण होवू शकतो. परंतु रस्त्याची रुंदी कमीत कमी ५ मी करण्यात यावी. अशी नागरिक मागणी करत आहे.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जाणून बुजून हेतूपुरस्कर दुर्लक्ष करत आहे. जे रस्त्याचे क्रॉक्रेटिकरण चालू आहे ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. इस्टीमेट नुसार काम होत नाही. जो क्राँक्रेट माल आहे तो बाहेरून आयता ढम्पर मिक्सर द्वारे माल येत आहे , तो निकृष्ट दर्जाचा येत आहे.याकडे संबंधित बांधकाम विभाग लक्ष देईल का? काम हे ऐनपूर ग्रामपंचायत हद्दीत होत आहे परंतु ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. सदर रस्ता हा रहदारीचा असल्यामुळे या रस्यावर केळीमालाचे मोठमोठे ट्रकांची मोठी वाहातूक सुरु असते. रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याची प्राथमिक पाहणी केली असता काही ठिकाणी खडी अत्यंत कमी प्रमाणात वापरण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी क्राँक्रेट रस्ता होत आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधणे आवश्यक आहे, पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात थांबत असल्याने काही काळ वाहतूक बंद असते त्यामुळे सुलवाडी कोळदा येथील नागरिकांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत असतात. रस्त्याची ज्याठिकाणी उंची वाढवण्याची गरज आहे त्याठिकाणी उंची न वाढवता काम सुरू आहे. ल काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची नागरिकांची तक्रार असून संबंधित विभाग याकडे लक्ष देईल का?