ऐनपुर येथे किरकोळ कारणावरून मारहाण व दगडफेक…आठ जखमी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल । रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक झाली यात आठ जण जखमी झाले आहे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
या बाबत सविस्तर माहिती अशी की,ऐनपुर येथे मुस्लीम वाड्यात हैदर अली सैयद अली याने त्याच्या घरासमोर गोड भात ( न्याज ) चा कार्यक्रम ठेवला होता त्याच्या गोड भात ची चुल आमच्या घरासमोर का लावली यांचा राग शेख रशीद शेख अजीज यांना येऊन त्यांच्या सोबत असलेल्या १८ ते २० लोकांनी काठी लोखंडी रॉड दगड विटा मारुन हैदर अली सैयद अली व त्यांचे ७ ते ८ साथीदार यांना मारुन गंभीर दुखापत केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली या कारणांमुळे शनिवारी ११ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मुस्लीम वाड्यात दोन गटात वाद होऊन दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत आठ जण जखमी झाले असून यातील दोन गंभीर जखमी झाले आहेत,जखमींची नावे पुढील प्रमाणे सैय्यद रहमत, सैय्यद शाहदत , सैय्यद शौकत , अकीला बी शेख आबीत , जुबेर खान , आलंगीर खान आबीत खान, शरीफ खान , हैदर अली सैय्यद अली , शेख जलील शेख सलीम या जखमींना उपचारासाठी जळगाव येथील शासकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे आपला फौजफाटा घेऊन ऐनपुर येथे दाखल झाले व येथील परीस्थिती आटोक्यात आणली या बाबत निंभोरा पोलीस स्टेशन येथे कलम ३२४,३२६,१४३,१४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असून आरोपी फरार आहेत या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काशिनाथ कोळंबे, हवालदार विकास कोल्हे , जानेश्वर चौधरी , नितीन पाटील , स्वप्निल पाटील , ईश्वर चौहान हे करीत आहे आहे गावात सर्वत्र शांतता आहे.