भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

ऐनपूर महाविद्यालयाच्या विषेश हिवाळी शिबिराचे उद्घाटन संपन्न

प्रत्येक घरातून एक सैनिक असणे गरजेचे :- प्रा.दिलीप सोनवणे

निंभोरा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच बलवाडी येथे ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराचे दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी बलवाडी येथिल जि.प मराठी शाळेत उद्दघाटन निंभोरा येथिल रहिवाशी १९७१ युध्दातील जख्मी माजी सैनिक स्व.सुधाकर गंजी धनगर यांचे सुपुत्र प्रा.दिलीप सुधाकर सोनवणे यांच्या शुभ हस्ते पार पडले.

त्या वेळी ते बोलतांना म्हणाले की प्रत्येक घरात देशभक्ती रूजून एक सैनिक तयार झालाच पाहिजे हि उद्याच्या भारताची गरज आहे असे प्रतिपादन करूण त्यांनी १९७१ युध्दात त्यांच्या वडीलांनी केलेल्या देशभक्ती ची सविस्तर माहिती सांगून वातावरण भारावून टाकले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने हे होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात श्रम संस्कार शिबिराचे महत्त्व विषद करत उद्याच्या भारताचे भविष्य शिबिरार्थी असून हे शिबीर तुमच्या सुप्त कलागुणांना वाव देनारे शिबीर असल्याचे नमुद केले.

संतोष महाजन व दिलशाद खान सर यांच्या भाषनाने विद्यार्थ्यांनमध्ये स्फूर्ती जागृत झाली. या वेळी व्यासपीठावर सरपंच सौ.वैशाली महाजन, उपसरपंच संजय वाघ, ग्रा.प.स जितेंद्र महाजन, ग्रा.प.अधिकारी प्रकाश तायडे, संतोष महाजन, बा.ना विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील, निंभोरा ग्रा.प.स दिलशाद खान सर, शालेय व्यावस्थापण समिती अध्यक्ष अजय ठाकरे, महाविद्यालयाचे मुख्य लिपिक गोपाल महाजन आदि मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. डी.बी.पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन विद्यार्थीनी निकीता कोळी व आभार मयुरी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, कर्मचारी श्रेयस पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!