रावेरशैक्षणिक

ऐनपुर येथील डॉ. कुंदन पाटील डी.एम. कार्डियोलॉजी प्रशिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर, ता. रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ऐनपुर येथील रहिवासी असलेले विश्वनाथ गणु पाटील व मंगलाबाई विश्वनाथ पाटील यांचे सुपुत्र डॉ कुंदन पाटील यांनी केरळ मधील प्रख्यात मेडिकल कॉलेज मधुन डी एम कार्डियोलॉजीचे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.

सविस्तर वृत्त असे की, ऐनपुर येथील रहिवाशी विश्वनाथ गणु पाटील व मंगलाबाई विश्वनाथ पाटील यांचे सुपुत्र डॉ.कुंदन पाटील यांनी डी.एम. कार्डियोलॉजीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या केरळ मधील गवर्नमेंट मेडिकल (कालिकत) कॉलेज मधुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले आहे. त्यांनी एम.बी.बी.एस.(MBBS) चे प्रशिक्षण मुंबई येथील नायर हॉस्पिटल मधुन व नंतर डी.एन.बी.(DNB) जनरल मेडिसिन ची पदवी मिळवली. त्यांनी NEET-SS या स्पर्धा परीक्षेत देशात ९२वा क्रमांक मिळवला होता.असा अभ्यासक्रम पार पाडनारे डॉ. कुंदन पाटील जिल्ह्यातील मोजक्या डाक्टरांपैकी एक आहेत. परिसारातुन डॉ कुंदन पाटील व परिवाराचे शुभेच्छा व अभिनदंन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!