जागतिक शौचालय दिनीही ऐनपुर येथे सार्वजनिक शौचालयात घाणीचे सम्राज्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर,प्रतिनिधी। १९ नोव्हेबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो ,ऐनपुर येथे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे परन्तु ग्राम पंचायतीन योग्य लक्ष न दिल्या मुळे शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सार्वजनिक शोचालयत आज पर्यत कोणतिही साफ सफाई झालेली नाही ही बाब अत्यंत खेद जनक असुन शासन दरवर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात लाखो रूपये खर्च करुन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करत असते जेणे करुन लोक ऊघड्यावर शौच्यालयास बसणार नाही पंरतु शौचालय पडक्या अवस्थेत असल्या मुळे नागरिकाची गैर सोय होत आहे .
जागतिक शौचालयदिना निमित्त राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानामध्ये सार्वजनिक शोचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरत स्वच्छता करणे आणी सुभोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयची दुरुस्ती करणे यावर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयाचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते परंतु एनपुर येथे सार्वजनिक शौचालयात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही शौचालयाची अत्यंत दुरावस्ता झालेली आहे . जागतिक शौचालय दिवस ग्रामपंचायत कागदावरच साजरा करीत आहे का?