रावेर

ऐनपूर येथे ग्रामसभा संपन्न,
अनेक समस्यांवर चर्चा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे,प्रतिनिधी। ऐनपूर येथे घरकुल ड यादीचे वाचन करण्यात आले व १५ वा युक्त आयोगातून कोणकोणते कामे करायचे आहे यावर चर्चा करण्यात आली .

वार्डानुसार करावयाच्या कामांचा सविस्तर आराखडा वार्ड क्रमांक ५ मध्ये मागासवर्गीय नवीन सामाजिक सभागृहासमोर व अंगणावाडी समोरिल पेव्हर ब्लॉक बसविणे . वार्ड क्रमांक मध्ये पी. के . टेलर यांच्या घरासमोर काँक्रिटिकरण व गटार बांधणे . वार्ड क्रमांक 2मध्ये मुस्लीम वस्ती व गढीवाडा येथे गटार व रस्ता दुरुस्ती करणे . वार्ड क्रमांक ३ मध्ये परधाडे वाडा कॉक्रीटीकरण संरक्षण भिंत बांधणे . मढीवाडा रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे . बस स्टॉप परिसर सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसवणे तसेच शोभेची झाडे लावणे . ग्रामसेवक यांनी या विषयांवर चर्चा करून १५ युक्त आयोग व यादी ड चे वाचन केले . ग्रामसभे मध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर चर्चा करण्यात आली . त्या समस्या खालील प्रमाणे आहेत . धम्मपाल हिवरे यांच्या घराजवळील लिकेज जोडणे, दुर्गादेवी मंदीर ते विलास तायडे यांच्या घरापर्यंत गटार बांधणे व विश्वनाथ चेंडू कोळी ते उखा तेली यांच्या घरापर्यंत गटार बांधणे , फलक ते रेखा जैतकर यांच्या घरापर्यंत गरार बांधणे , पी .के . टेलर ते कडू बोहर्डे यांच्या घरापर्यंत गटार बांधणे, सार्वजनिक शौचालयाठिकाणी लाईट लावणे, प्रमोद भालेराव यांच्या घरापासून ते बेकरी पर्यंत पेव्हरब्लॉक बसविणे, धनगर वाड्याजवळील रस्ता कामी पुनर्वसन विभागाकडे परवानगी मागणे, राहुल महाजन यांच्या घरा जवळ धापे टाकणे, पुनर्वसन टप्पा क्रमांक ३ मध्ये डी.पी जवळ डस्बिन ठेवणे व रस्ता दुरुस्त करणे , ड यादीत ज्यांची नावे सुटली आहेत त्यांची नावे वाढवणे , रामदास नारायण महाजन व श्रीराम नारायण पाटील यांना रस्यावर पाणी सोडले बाबत नोटीस देणे , धमगर वाड्याजवळील टपरीधारकांना नोटीस देणे , पुनर्वसन टप्पा क्रमांक 2 मधील सुभाष पाटील व गुलाब कासार यांच्या घराजवळील घाट दुरुस्ती करणे , MCEB कर्मचारी रात्री गावात राहणे बाबत ऑफीसला पत्र देणे , पुढील सभेला प्रायेक सभेचा अजेंडा देणे सर्व शासकीय कर्मचारी यांना, विट भट्टी धरकांना परवानगी देवू नये, मोबाइल टॉवर वाल्यांना नोटीस देणे व सिल करणे, बसस्टॉप जवळील मुतारी जवळ फरशी ठेवणे, बाजीराव अवसरमल यांच्या घराजवळ धक्का बाधकाम करणे १५वा युक्त आयोगामधून , व दलित वस्ती मध्ये पोल बसविणे तसेच पेयजल योजनेचे माहितीच्या दप्तरीची मागणी करण्यात आली . या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली .

आजची ग्रामसभा सरपंच अमोल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या सभेला ग्रामपंचायत सदस्य खालील प्रमाणे उपस्थित होते . उपसरपंच दिपाली अतुल पाटील , सतीश अवसरमल , अनिल कोळी , किशोर पाटील, नजीर शेख , राजेश पाटील, दिपाली राहुल महाजन , प्रियंका पंकज पाटील , ग्रासेवक प्रताप बोडदे व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल खैरे , शरद अवसरमल , ईश्वर अवसरमल, अरविंद महाजन , शेख शफी , पृथ्वीनाथ जैतकर, राहुल महाजन , पत्रकार विजय अवसरमल व गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!