भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षां विषयी मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर,मंडे टू मंडे,विजय के अवसरमल
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे विद्यार्थ्यासाठी “स्पर्धा परीक्षा मधील गणित व बुद्धिमत्ते च्या युक्त्या” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय न्हायदे, संचालक विद्याधन अकॅडमी, अमळनेर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासना तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षां बद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी गणित व बुद्धिमत्ता या विषयातील विविध युक्त्या समजावून सांगितल्या. विद्यार्थ्याशी हितगूज करतांना त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण व्हावी त्यात ते यशस्वी व्हावेत यासाठी सदर केंद्र महाविद्यालयात कार्यरत आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी तर आभार डॉ. संदीप एस. साळुंके यांनी मानले. सदर कार्यक्रमाला एकूण ७८ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. एच एम. बाविस्कर, डॉ. पी. आर. महाजन आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!