भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपूर येथे अनेक प्रश्नांनी गाजली ग्रामसभा,अनेक अधिकारी गैरहजर,ऑनलाइन घेण्यावर नागरिकांची नाराजी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपूर ,ता.रावेर, विजय .के.अवसरमल। ऐनपूर येथे २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु गावातील नागरिकांनी सभेपासून पाठ फिरवल्यामुळे कोरम अभावी ऑनलाइन सभा तहकूब करण्यात आली होती. व पुढील सभा ३१ जानेवारी रोजी घेण्याचे ठरवण्यात आले होते. त्या अनुशंगाने आज ऐनपूर येथे ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले. २६ नागरिक ऑनलाइन सभेला जॉईन झाले होते. त्यात पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच माझी वसुंधरा योजनेवर ग्रामविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. अनेक लोकांनी समस्या मांडल्या . सार्वजनिक शौचालय , पाणीपुरवठा , रस्ते , इलेक्ट्रीक वीज पोल , गटारी तसेच पेव्हरब्लॉक बसवणे , ज्या गाळेधारकांकडे थकबाकी असेल त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यात यावी अन्यथा गाळे खाली करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली.

विविध शासकीय अधिकारी ग्रामसभेला हजर नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जसे वैद्यकीय अधिकारी , पशुवैद्यकीय अधिकारी, एम. ए. सी. बी अधिकारी , रेशन दुकानदार अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा विविध प्रश्नांवर नागरिकांनी समस्या मांडल्या व ठराव पास करण्यात आले . परंतु ऑनलाइन सभा घेतल्यामुळे बरेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कारण ग्रामसभा ही ग्रामीन भागाचा कणा असल्यामुळे प्रत्येक नागरिक सभेत आपल्या समस्या मांडत असतो. परंतु ऑनलाइन सभा असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना आपल्या समस्या मांडता आल्या नाही. बरेच नागरिक सभेपासून वंचित राहिले. शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, ज्या ठिकाणी कोविड रुग्ण कमी असतील त्या ठिकाणी तुमच्या स्तरावर ऑफलाइन सभा घेण्यात यावी. परंतु ऐनपूर मध्ये कोविड रुग्ण नसल्यामुळे ऑफलाइन सभा घेतली गेली पाहिजे होती. परंतु ऑनलाइन सभा घेण्यामागचे गोडबंगाल काय? आजच्या सभेचे अध्यक्ष सरपंच अमोल महाजन होते. पवन पाटील ,सतीश अवसरमल , रंजना जैतकर , रुपाली अवसरमल , किशोर पाटील , नजीर शेख , राजेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते. परंतु ही सभा ऑनलाइन असल्यामुळे गावातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!