ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी व संध्याकाळी ओ. पि. डी.सुरू करण्याची मागणी…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐंनपुर,ता.रावेर,विजय के अवसरमल । ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी व संध्याकाळी ओ.पि.डी.काढण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमी प्रमाणे सकाळी ९ ते १२ अशी ओ.पी.डी. सुरू असून ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागात येत असून या आरोग्य केंद्राचे अंतर्गत २३ गावे लागू आहे या गावातील लोकांचा व्यवसाय हा शेती व मजुरी चा आहे त्या अनुषंगाने या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत सकाळी व संध्याकाळी जर ओ.पी.डी.सुरू राहीली तर शेतकरी व मजुर वर्गातील लोकांना सोईचे होईल या भागातील नागरिकांची ओरड बऱ्याच दिवसापासून सुरू असून दि.२४/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत कर्यकरणीच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली व सकाळ व संध्याकाळ ओ. पि. डी.सुरू ठेवण्याचा ठराव संमत करण्यात आला या आशयाचे पत्र ऐंनपुर ग्रामपंचायत चे सरपंच अमोल महाजन यांनी प्रा.आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटील यांना दिले या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असून एक सकाळी व एक संध्याकाळी येवून ओ.पि. डी.सुरू करावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.