ऐनपूर महाविद्यालयात कौमी एकता सप्ताह संपन्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता या विषयावर इतिहास विभागाचे प्राध्यापक विनोद तायडे यांनी आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे अनेक पंथाचे अनेक जातीचे लोक राहतात तरीपण आपल्या देशा मध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसून येते ही आपल्या देशाची मोठी उपलब्धी आहे. भारत देशामध्ये विविधतेतून एकता निर्माण झालेली आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी अंजने होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विनोद रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला 75 विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे आभार प्रा. जे पी नेहेते यांनी केले.
दुसऱ्या दिवशी भाषिक सुसंवाद दिवसाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी भाषिक सुसंवाद दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विनोद रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला 71 विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डाॅ डी बी पाटील यांनी केले. कौमी एकता सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी जोपासना दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागाचे प्राध्यापक अक्षय महाजन यांनी पर्यावरणाची जोपासना व जाणीवजागृती याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी सुद्धा पर्यावरणाची जोपासना केल्यामुळे ऑक्सिजन मध्ये वाढ होते व त्यामुळे मानवाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असे सांगितले . विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक विनोद रामटेके यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ विद्यार्थ्यांना दिली व या कार्यक्रमाला 69 विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. मान्यवरांचे आभार प्रा.डाॅ जे.पी. नेहते यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली अशाप्रकारे हा कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आला