ऐनपुर येथे नूतन प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटील रुजू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर ता रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा। ऐनपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक 27सप्टेंबर रोजी प्रथम वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ नीरज पाटील यांनी पदभार स्वीकारला असून त्यांचा ऐनपुर प्रा आ केंद्रातर्फे तसेच पत्रकार बंधुतर्फे सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ऐनपुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक महाजन यांची ऐनपुर येथून लोहरा येथे बदली होऊन त्याच्या जागी नूतन वैद्यकीय अधिकारी डॉ नीरज पाटील यांनी पदभार स्वीकारला असून त्याबाबत त्यांचा येथील वैद्यकीय अधिकारी संदीप चवरे यांच्या समवेत सर्व कर्मचारी यांनी स्वागत व सत्कार केले. तसेच ऐनपुर येथील पत्रकार बांधवांकडुन सुद्धा डॉ नीरज पाटील यांचा सत्कार करण्यात आला,त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप चवरे सह शब्बीर तड़वी,प्रवीण चौधरी,सतीश बोरोले,शांतिलाल पाटील, विशाल पाटील,शेखर भाऊ, ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर व पत्रकार बांधव उपस्थित होते