ऐनपूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस कोठडी
ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे काल १३० रुपयांच्या उधारी साठी आरोपी पन्नालाल कोरकू याचे भीमसिंग जगदीश पवार याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान वादात झाल्याने पन्नालाल सोमा कोरकू याने भिमसिंग पवार याच्या गुप्तांगाला पिळून टाकले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
रात्री उशीरा आरोपीला अटक करण्यात आली आज सकाळी त्याला रावेर येथील न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत दि. 9/5 /2022 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत सदर घटनेचा तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी हे करीत आहेत.