बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तीमत्व…….प्रा.डॉ. सतिश अहिरे…
ऐनपूर/खिर्डी ,ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिशांच्या मंत्री मंडळात ते स्वतंत्र भारताच्या मंत्री मंडळात कायदामंत्री असतांना त्यांनी महिलांसाठी व देशाच्या हितासाठी विविध आघाड्यांवर उच्च प्रतीची कामं केलेली असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्व एक बहुआयामी असल्याचे प्रतिपादन धुळे येथील युवा वक्ते प्रा.डॉ. सतिश अहिरे यांनी रावेर येथे सामाजिक समता मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. ते येथील सौ.कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हाँल मधे आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलत होते.
प्रा.अहिरे पुढे म्हणाले की ,सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारची सुटी व विविध रजा ज्या मिळतात त्या डॉ बाबासाहेबांची देन असून ,महिलांना प्रसुतीसाठी भर पगारी रजा, शिक्षणात संधी व विविध सवलती,भारतीय मंत्री मंडळात असतांना नदीजोड प्रकल्प, व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचे खूप मोठे योगदान असुन या देशातील बहुजन लोकांच्या हितासाठी अनेक कायदे तयार करून येथील बहुजन, शेतकरी, कष्टकरी यांना स्वातंत्र्य, समता बंधुतेने या देशात वागणूक मिळावी अशी भारतीय संविधानात तरतूद करून नव भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे किती मोठे योगदान आहे या विषयी अनेक उदाहरणे देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक जळगाव जिल्हा रिपाई चे अध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी होते तर दिप व धुप पुजन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे रावेर तालुका अध्यक्ष राजन लासुरकर,मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष विलास ताठे,छावा संघाचे अमोल कोल्हे,पं.स.सदस्य दिपक पाटील, दिलीप सपकाळे, गोंडु महाजन, महिला दक्षता समिती अध्यक्षा कांता बोरा,तांदलवाडी सरपंच सुरेखा तायडे, कोचुर सरपंच स्वाती परदेशी, नगरसेविका रंजना गजरे,जगदीश घेटे,पंकज वाघ,विनोद पाटील, प्रमोद पाटील, सोपान पाटील,प्रा.संदीप धापसे, अनोमदर्शी तायडे,अँड. योगेश गजरे,अँड.सुभाष ,संतोष गाढे सर, दिपरत्न तायडे, राजेंद्र अटकाळे, संतोष कोल्हे, संघरत्न दामोदरे, शे. निजामुद्दीन शे. मूनिर, अॅड. लक्ष्मण शिंदे, विजय अवसरमल, अँड.राजकुमार लोखंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजु सवर्णे,कार्याध्यक्ष उमेश गाढे,यांचेसह संचालक अँड.शिवदास कोचुरे,विलास अवसरमल ,उत्तम वाघ,राजेंद्र सावळे,उत्तम प्रधान, संतोष लहासे,प्रवीण लहासे,प्रदिप घेटे,अँड.सचिन तायडे, संदिप लहासे,महेंद्र कोचुरे,जगदीश कोचुरे,उमेश तायडे, अंकुश जाधव,प्रल्हाद गाढे,कांतीलाल गाढे,प्रकाश महाले,वाय.एस.महाजन,अशोक रायमळे,ईश्वर अटकाळे,यांनी परिश्रम घेतले, सुत्रसंचालन सामाजिक समता मंचचे सचिव नगीनदास इंगळे यांनी केले तर आभार अँड.योगेश गजरे यांनी मानले.