नुकसानग्रस्ताना भरपाई मिळावी,
ऐनपुर ग्रामपंचायत तर्फे
विरोधी पक्षनेते फडणवीस यांना निवेदन
Monday To Monday NewsNetwork।
ऐनपुर ता.रावेर/(प्रतिनिधी)। रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तसेच वादळी पावसामुळे तालुक्यातील बऱ्याच गावांत शेतीचे तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले होते. व काही कुटुंबांचा संसार उघड्यावर होता तसेच शेतातील केळी बागा या आडव्या पडून शेतकार्याचे बरेच नुकसान झाले होते त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता मा. देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर होते.
मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील ज्या ज्या गावांमधे शेती,केळीबागांचे तसेच घरांचे नुकसान झाले होते त्या त्या गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतीबांधावर जाउन नुकसानग्रस्त झालेल्या भागातील पाहणी देवेंद्रजी फडणवीस यानी नियोजित वेळेत केली तसेच रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे सुद्धा त्यांनी पाहणी केली त्यावेळेस मौजे ऐनपुर ग्रामपंचायत तर्फे वादळी पावसामुळे ऐनपुर येथे घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले असल्यामुळे झालेल्या नुकसानाची 100% नुकसान भरपाई शासनाकडुन त्वरित मिळावी जेने करुण नुकसानग्रस्त नाकरिकाना व शेतकर्यांना आपला उदरनिर्वाह करता येईल अशा आशयाचे निवेदन विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधानसभा तथा माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले.तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून आश्वासित केले. त्यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन,नंदू महाजन,भाजपा पदाधिकारी तसेच परिसरातील बरेचसे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.