भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

शौचालय घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी

ऐनपूर,ता.Raver,मंडे टू मंडे न्युज,विजय के. अवसरमल
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समिती रावेर येथे ऑगस्ट २०२० ते २०२२ या दिड वर्षात झालेला जवळपास दीड कोटी रुपयांचा घोटाळा उघडीस आल्याने रावेर (raver) पोलिस स्टेशनमध्ये दोन संशयीत आरोपी कंत्राटी गट समंवयक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हे जरी सत्य असले तरी प्रत्यक्षात पूर्ण सत्य नाहीच कारण कंत्राटी कामगार कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या नेत्याचा वरदस्त असल्याशिवाय व प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीशिवाय एवढा अपहार करणे शक्यच नाही व दिड कोटी ही रक्कम फक्त ऑगस्ट २०२० पासूनच असून सदर कंत्राटी कामगार हे सन २०१२ पासून पंचायत समिती रावेर येथे नियुक्तीवर असल्याने यांच्या नियुक्ती पासून सखोल चौकशी झाल्यास हा अपहाराचा आकडा कोटींच्या घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या घोटाळ्याचे मास्टारमाइंड , या आरोपीचे राजकीय गॉडफादर व खेड्यापाड्यांतून प्रकरणे आणुन देणारे व यांचा गरिबांची संडास खाणारा खरा चेहरा जनतेसमोर येणे कामी सदर शौचालय घोटाळ्याची सन २०१२ पासुन आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणे कामी व विधी मंडळ स्तरावरून योग्य ती कारवाई करणे कामी आज बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप सपकाळे व रावेर तालुका काँग्रेस अनु.जाती विभागाचे तालुका अध्यक्ष सावन मेढे यांनी आ.शिरीष चौधरी यांची भेट घेवून निवेदन देऊन मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप साबळे, संतोष पाटील, धुमा तायडे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!