भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनार संपन्न

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर, ता. रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील ऐनपूर येथील ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त ऐनपूर महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

वेबिनार चे प्रमुख वक्ते श्रीपाद श्रीकृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद चे प्रा. डॉ. प्रविण डाबरे हे होते त्यांनी आपल्या व्याख्यानात मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच मेजर ध्यानचंद यांनी भारताच्या राष्ट्रीय खेळाचे अर्थात हॉकीचे दैदीप्यमान दिवस भारतासाठी कसे आणले व मेजर ध्यानचंद यांना “हॉकीचा जादूगार” असे का संबोधले जाते. यावर त्यांनी प्रकाश टाकला या वेबिनार चे दुसरे प्रमुख वक्ते ऐनपूर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी. आर. गवळी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रिडा विश्वातील योगदानाविषयी आपले विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने यांनी आपले विचार मांडतांना असे म्हटले की,जीवनात कोणताही एक खेळ खेळावा,त्यामुळे आपले शरीर सुदृढ होते व भावनिक ताण-तणावापासून मुक्ती मिळते.याचे महत्त्व सांगितले.या वेबिनार चे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.संदीप साळुंके यांनी केले या वेबिनारचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे क्रिडा संचालक डॉ. सचिन झोपे यांनी करून दिला. या वेबिनार चे टेक्निशियन म्हणून प्रा.डॉ.जे पी नेहेते,प्रा. एच.एम.बाविस्कर यांनी मोलाचे सहकार्य दिले. या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.आर.व्ही.भोळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचे सहकार्य लाभले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!