भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णाचे हाल…आरोग्यसेविका हजर होईनात…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐंनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐंनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची बदली होऊन दीड ते दोन महिने होऊन गेले त्यांचे जागेवर दुसरे कर्मचारी आजपर्यंत हजर झालेले नाही

सविस्तर वृत्त असे की ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका राणे बी बी यांची लोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायिका या पदावर पदोन्नती होऊन त्यांना त्यांना ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातून समारोप देवून कार्यमुक्त करण्यात आले परंतु त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पिंपळगाव तालुका भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चारुशीला अनिल पाटील यांची पदोन्नती होऊन ऐंनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायीका म्हणून बदली होऊन दीड ते दोन महिने झाले असून आजपर्यंत त्या हजर झालेले नाही त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे तसेच रिक्त पदांमुळे रुग्णसेवा देताना अडचण निर्माण होत आहे आठ ते नऊ हजार लोकसंख्या असलेल्या ऐंनपुर तसेच ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला लागून असलेले सात उपकेंद्र ला लागून २३ गावात आधीच कर्मचारी संख्या रिक्त असल्याने रुग्णांना सेवा देणे कठीण झाले आहेत इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणे हे साहजिकच आहे.


दीड ते दोन महिने उलटून सुद्धा आरोग्य सहयिका हजर न होत असल्याने तसेच बरेचसे पदे रिक्त असल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सदर आरोग्य साहायिका या रिक्त पदाबाबत ऐंनपुर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी १० डिसेंबर २०२१ रोजी म. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.जळगाव यांना या बाबतचे पत्र दिलेले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायिका १पद, आरोग्य सेविका ५ पद ऐंनपुर उपकेंद्र १, ओ पी डी १,धामोडी ,खिरोदा प्र.रावेर, पतोंडी,तसेच शिपाई ३ पदे असे जवळजवळ ८ ते ९ पदे रिक्त आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असून पाहिजे तशी रुग्णांना सेवा दिली जात नाही प्राथमिक आरोग्य केंद्रात तीनच आरोग्य सेविका असल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे भरण्यात येतील का? तसेच आरोग्य साहायिका यांना हजर होण्यासाठी मुहूर्त मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!