यावल तालुक्यातील सांगवी येथील घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी निदर्शने
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,विजय के अवसरमल। सांगवी ता. यावल निषेधार्थ आदिवासी संघर्ष समिती तसेच आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने नुकतेच विविध ठिकाणी कार्यालयांमध्ये निवेदने देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगवी ता . यावल येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तीव्र निषेध म्हणून तहसील कार्यालय रावेर , प्रांताधिकारी फैजपूर , उपअधिक्षक फैजपूर सावदा पो. स्टे तहसिल मुक्ताईनगर व मा. आमदार चंद्रकांत पाटील यांना आदिवासी कोळी महासंघ , जिल्हा आदिवासी संघर्ष समिती व तालुका कार्यकारणी व आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपींना पोस्को (posco) आणि शक्ती कायद्याने फाशिची शिक्षा झाली पाहिजे तसेच मनोधैर्य योजनेतून पिडितेला समाजात मानाने जगता यावे यासाठी आर्थिक मदत मिळावी तसेच सदरील खटला चालवण्यासाठी सन्माननीय वकील उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर पिढीतेला सुरक्षितते व भविष्याच्या दृष्टिने योग्य तो न्याय मिळावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी युवा पिढीतील रणरागिनी म्हणून शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलींनी स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाऱ्यां विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. अशा नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे , जिल्हा मार्गदर्शक गंभीर उन्हाळे , जिल्हा सल्लागार चंद्रकांत कोळी , जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी , पंचायत सदस्य रुपाली कोळी , जिल्हा प्रसीद्धी प्रमुख विनोद कोळी, संघर्ष समिती महिला आ. जिल्हाअध्यक्ष सुनिता तायडे , आ. कोळी समाज अध्यक्ष नारायण तायडे , आ. को .स . ता अध्यक्ष मनोहर कोळी , आ. को . समिती अध्यक्ष चंद्रकांत कोळी , आ. को. म. युवाअध्यक्ष दिलीप कोळी , महिला ता. अध्यक्ष सविता कोळी , आ .को .स उपाध्यक्ष नितीन कोळी सर , ता. उपाध्यक्ष सपना कोळी , रोहिणी तायडे , काजल तायडे , साक्षी कोळी , माधुरी सपकाळे , सुपडू कोळी , ता. युवा संघटक ईश्वर कोळी , किशोर कोळी , तुषार कोळी उपसरपंच , प्रविण सपकाळे , पृथ्वी जैतकर , गोपाळ कोळी , आनंदा सपकाळे , भगवान कोळी , नितेश कोळी , विनोद कोळी , पंडित कोळी , मनोज वाघ , भागवत कोळी , बंटी कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.