ऐनपूर महाविद्यालयात महात्मा गांधी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व या ई- ग्रंथाचे प्रकाशन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर.प्रतिनिधी। सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे मानसशास्त्र विभागातर्फे व प्रकाशन विभागातर्फे महात्मा गांधी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व या ई -ग्रंथाचे प्रकाशन मा.प्रा. डॉ. दिलीप तुकाराम कदम, इतिहास विभाग, ना.ग. तु. पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या हस्ते दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. व त्यांनी महात्मा गांधी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल व १९१६ पासून ते १९४७ पर्यंत घडलेल्या घटनांविषयी अभ्यासपूर्ण मोलाचे मार्गदर्शन केले.
या ई – ग्रंथाच्या निर्मितीसाठी १८ लेखकांनी त्यांचे लेख पाठविले होते. त्यापैकी एक लेखक, प्राचार्य अवटी सर मुंबई यांनी हे ग्रंथ अगदी योग्य वेळी व अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले असे त्यांच्या मनोगतात सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. विनोद रामटेके यांनी केले.या ग्रंथाचे संपादन प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, प्रा. विनोद रामटेके व डॉ .संदीप साळुंके यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी महात्मा गांधीजी यांच्या अनेक चळवळींचा उहापोह केला.या कार्यक्रमाला १७५ विद्यार्थी,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे संचालक मंडळ, व नागरिक उपस्थित होते. शेवटी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. संदीप साळुंके यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली