भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपूर ग्रामपंचायत मध्ये मतदार याद्यांच वाचन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी व दुरुस्ती करून ती त्रृटी विरहित करण्याचा तसेच १ जानेवारी या २०२२ या अर्हता दिनाका नुसार नविन मतदार नावनोदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत १६ जानेवारी रोजी ऐनपूर येथील ग्राम पंचायती मध्ये मतदार यादींच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले .

या विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुशंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभे मध्ये गावातील सर्व नागरिकाना पाहण्यासाठी आणि तपासणी साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आले ज्याचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे त्यांची नवीन मतदार म्हणून तसेच लग्न होवून गावात आलेल्या महिलांची नावनोंदणी करण्यात येईल . तरी सर्व ग्रामस्थानी या विशेष सभेत सहभागी होवून मतदार यादीतील नावनोंदणी , नावाची दुरुस्ती तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी असे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी केले . आजच्या ग्रामसभे मध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . उप सरपंच दिपाली अतुल पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल कोळी , सतीष अवसरमल , माजी ग्रामपंचायत सदस्य शरद अवसरमल , पृथ्वीनाथ जैतकर , सुरेश कोळी , प्रकाश भिल्ल, फकिरा भिल्ल, अरविंद महाजन, शेख शफी , तसेच राहुल महाजन , भुषण महाजन, अनुप पाटील, जिल्हा परिषद शाळेचे व ऊर्दू शाळेचे शिक्षक , विजय . एस . अवसरमल , शरीफ सर , विजय . के . अवसरमल व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!