ऐनपूर पुर्नवसन संघर्ष समितीचे जलसमाधी आदोलन यशस्वी
ऐनपुर, तालुका – रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l ऐनपूर ता रावेर दि ११ – येथील पुर्नवसन संघर्ष समितीच्या वतीने जल समाधी आदोलन येथील सुस्ती तापी नदी पात्रात करण्यात आले या आदोलनास पूर्नवसनचे उप अभियता बागुल यानी आदोलनास भेट देवून त्याचे म्हणणे ऐकून व त्याना आश्वासन देवून आदोलन सहा तासा नंतर मागे घेण्यात आले.
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील पुर्नवसन संघर्ष समिती गेल्या दहा वर्षा पासून राहिलेले घरे तसेच नविन पाठविलेले २५० घरे तात्काळ पुर्नवसन करण्यात यावे तसेच सबधीत विभागास वेळोवेळी कागद पत्रे दिले असून सुद्धा वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने दि ११ रोजी सुलवाडी येथील सुस्ती परीसरातील तापी बॅक वॉटर मध्ये जलसमाधी आदोलन करण्यात आले सकाळी ९ वाजता बसस्थानकावरील सरदार पटेल पुतळयास हार घालून वाजत गाजत पूर्नवसन संर्घष समितीने तापी नदी कडे मार्गक्रमण केले .
त्याठिकाणी सर्व आदोलक पाण्यात महिला पुरुष उतरून आदोलन केले यावेळी परिसरातील भांबलवाडी . वाघाडी नेहता ऐनपूर सह गावातील लोकानी सहभाग घेतला व जो पर्यत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यत आदोलन मागे न घेण्याच्या घोषणा देण्यात आल्या व वरिष्ठांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यावर ठाम राहिले प्रशासनाच्या वतीने आदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतू ठोक आश्वासन मिळत नाही तोपर्यत आदोलन मागे घेणार नाही असे आदोलकानी म्हटले अखेर उप कार्यकारी अभियता बागुल यानी आदोलनास भेट देवून त्याचे म्हणणे ऐकून . आदोलनकर्ते व मी स्वतः तुमच्या सोबत मंत्र्यालयात येतो आणि त्याठिकाणी पूर्नवसन मंत्री सोबत बैठक लावून आपला पूर्नवसनाचा मार्ग मोकळा करू असे लेखी आश्वासन देवून आदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी रावेर तहसिलदार बंडू कापसे . ऐनपूर मंडळ अधिकारी गजेद्र शेलकर . तलाठी शरद सूर्यवशी . कोतवाल नयना अवसरमल . खिर्डी सर्कल प्रविण नेहेते . बलवाडी तलाठी अश्वीनी हंडे . काडवेल तलाठी शाम तिडके कोतवाल तुषार पाटील ऐनपूर ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यासह अधिकारी उपस्थितीत होते तर यावेळी निभोरा पोलिस स्टेशनचे स.पो.नि . हरिदास बोचरे याच्या मार्गदर्शना खाली उपनिरिक्षक सावळे व पोलिस कर्मचारी यानी चोख बरोबस्त ठेवला.
ऐनपूर सरपंच अमोल महाजन स्वतः आदोलन कर्त्याच्या मागण्यासाठी तापी नदीत पात्रात ६ तास आदोलन केले
पाण्यात तोल गेल्याने एक आंदोलक बेशुद्ध झाला तापी नदी पात्रात आंदोलन करीत असतांनाच शेख राजू शेख सुभान यांचा पाण्यात तोल गेल्याने त्यांच्या नाक व तोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला आंदोलक यांच्या लक्षात येताच त्यांना त्वरीत बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन परदेशी यांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला ग्रामपंचायत सदस्य शेख शफी शेख रशीद शेख हारुन जलील खान शेख आक्रम यांनी रुग्ण वाहीकेतून नेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ते पुढील उपचार घेत आहेत.