भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सह कर्मचारी मुख्यालयी रहात नसल्याने रुग्णांचे हाल, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे रावेर तालुक्यातील पहीलं आरोग्य केंद्र आहे.हे आरोग्य केंद्र सन १९६०च्या कालखंडात जिल्हा परिषद अंतर्गत सुरु करण्यात आले, रावेर तालुक्यातील पहील्या आरोग्य केंद्राची निर्मिती झाली असेल ती ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची, तेव्हा पासून ते आजपर्यंत आरोग्य सेवा उत्कृष्ट कामगिरी या आरोग्य केंद्रात झाली आहे, अगदी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया चे कॅम्प महिलांची प्रसुतीपूर्व तपासणी याच दवाखान्यात प्रसुतीचे उत्तम नियोजन प्रसूती नंतर बाळाचे लसीकरण असे बरेच आरोग्याचे निगा राखणे चे काम याठिकाणी करण्यात आले परंतु काही वर्षांत या दवाखान्याची अवस्था खिळखिळी झालेली दिसत आहे.

जुना दवाखाना पाडून मोठी दवाखान्याची इमारत या ठिकाणी उभी करण्यात आली आहे, या आरोग्य केंद्राला २३ गावे लागू असून या गावांसाठी ४९ आशा स्वयंसेविका कार्यरत असून २ गटप्रवर्तक कार्य करीत आहे. या आरोग्य केंद्रात २९ कर्मचारी पाहीजे असून १७ जागा रिक्त आहेत एवढ्या मोठ्या गावाचा कारभार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टर एम बी बी एस अर्हता धारक पाहिजे परंतु या ठिकाणी एकच बी ए एम एस अर्हता धारक डॉक्टर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीनच आरोग्य सेविका दोन शिपाई एम पी डब्लू आरोग्य सेवक आहेत. यांच्या राहण्यासाठी नविन क्वार्टर तयार करण्यात आले आहे या क्वार्टर ला एक ही कर्मचारी राहत नसून डॉक्टरांपासून ते शिपाई पर्यंत सर्व कर्मचारी बाहेरच्या गावात राहत आहेत. वेळोवेळी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून कर्मचारी कोठा भरण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये मागणी केली असून या ठिकाणाहून बदली होऊन कर्मचारी गेले परन्तु त्यांच्या जागेवर कुठलाही कर्मचारी आलेला नाही,ऐनपुर उपकेंद्र येथील आरोग्य सेविका यांची बदली होऊन ३ ते ४ महीने झाले असून त्यांच्या जागेवर पिंपळगाव बु येथून चारूशिला पाटील आरोग्य सेविका यांची बदली ऐनपुर आरोग्य केंद्रात झाली असून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी बदली आदेश दिला आहे परंतु त्या ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होण्यासाठी आल्याच नाहीत म्हणजे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी दिलेल्या बदली आदेशाचा सुध्दा अपमान केलेला दिसत आहे.

ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री बेरात्री प्रसुती साठी पेशंट येत असतात परंतु रात्री या ठिकाणी कोणी ही कर्मचारी राहत नाही त्यामुळे पेशंटला रावेर ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते,रावेर रुग्णालयातील कर्मचारी हे ऐनपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून पेशंट याठिकाणी का आणतात असे बोलत असतात त्यामुळे पेशंटला मनस्ताप सहन करावा लागतो याची जबाबदारी ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घ्यायला तयार नाही एकमेकांवर जबाबदारी झटकत असतात या प्राथमिक आरोग्य केंद्राची फायनान्सशीयल जबाबदारी ऐनपुर येथून लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली होऊन गेलेले डॉक्टर यांचेकडे असून ते सध्या उंटावरून शेळी हाकालण्यासारखे करीत आहे शासकिय कर्मचाऱ्यांना हेडक्वार्टर ला रहीवास करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कुठलाही कर्मचारी हेडक्वार्टर ला रहीवास करीत नाही हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य जनतेचे काम वेळेत होत नसल्याची समस्या अधिक आहे त्याचप्रमाणे या आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसून गावकऱ्यांचे औषधे नसल्याने हाल होत आहेत रात्री बेरात्री ईमरजन्सी पेशंट आल्यावर याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात जर एखाद्या पेशंट चे बरेवाईट झाल्यावर याला जबाबदार कोण?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!