प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य ; वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
Monday To Monday NewsNetwork।
ऐनपुर ता.रावेर(प्रतिनिधी)। तालुक्यातील ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला निंबोल, विटवे, सुलवाड़ी,धामोड़ी यासारखे छोटछोटे बरेचसे खेड़े लागु आहे.तसेच दवाखान्यात आजुबाजुच्या लहान लहान खेड़े गावाहुन रुग्ण व प्रसूतिसाठी महिला रुग्ण आपल्या सोईसाठी व उपचारासाठी येत असतात. परंतु दवाखान्याच्या परिसरात आजूबाजुचा परिसर बघता सर्व कचरा तसेच दुर्गंधीयुक्त घाण व खुर्च्या,कपाट,पलंग,तसेच सलाइन च्या बाटल्या, नळ्या यासारखे साहित्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नसल्याने शासकीय मालमत्ता हि अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसत आहे , विशेष म्हणजे ही दुर्गंधीयुक्त घाण आणि भंगार दवाखान्याच्या कोविड-19 लसिकरण केन्द्राच्या तसेच इतर कक्ष च्या मागच्या बाजूने आहे आणि सद्या कोविड लसीकरण मोहिम राबवली जात असतांना या समस्येकड़े दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून परिसरात लहान मोठी झाडे, झुडपे,पाला-पाचोळा यामुळे या ठिकाणी दुर्गंधीयुक्त घाण होत आहे तसेच सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,तसेच मलेरिया टायफाईड या सारख्या विषाणू जन्य आजारांचा रुग्णांना सामना करावा लागू शकतो, इमारत च्या मागील परिसर बघता तिथे संबधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने अशीच अवस्था असेल तर या समस्येबाबत रुग्णांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण राहणार?
रुग्ण व परिसर स्वछतेबाबत आपली जबाबदारी दाखवत रुगणांना या असल्या समस्येपासून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून संबंधित अधिकारी लक्ष देऊन आपली जबाबदारी पार पाड़तील का?
शासकीय मालमत्ता रामभरोसे
याठिकानी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या इमारतीच्या मागच्या बाजूस अस्थाव्यस्त पडून असलेले पलंग,कपाट,लाकड़ी जाळया, कौले,इत्यादि व यासारखे बरेच साहित्य म्हणजेच शासकीय मालमत्ता ही तसीच रामभरोसे पडून आहे या शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे, या शासकीय मालमत्तेला असे रामभरोसे सोडने कितपत योग्य आहे? याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा प्रश्न निर्मान होत आहे.