ऐनपूर मध्ये सुरू असलेला सट्टा – मटका कोणाच्या आशीर्वादाने ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर ता.रावेर, प्रतिनिधी : गावांतील गजबजलेल्या भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या बस स्थानक परिसरातील अवैध धंद्यांचा सुळसुळाट कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. असा सवाल उपस्थित केला जात असून यंत्रणाची कुचकामी भूमिकांमुळेच सट्टा-मटक्याच्या गोरख धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ऐनपूर येथील बसस्थानक परिसरात दिवसा ढवळ्या सट्टा- मटका जोरात सुरु आहे . याकडे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन योग्य ती कारवाही करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सट्टा मटाक्या मुळे अनेक लोकांचे संसार उद्धस्थ होत आहेत. त्यामुळे सट्टा मटका कायम स्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे, येवढ्या भर चौकात सट्टा मटका बिनधास्तपणे सुरु आहे . त्यांना कुणाचा धाक वगैरे नाही का? की, कुणाच्या पाठबळामुळे सट्टा मटका सुरु आहे कुठेतरी आर्थिक देवाणखेवाण होत आहे का? की ज्यांचा धाक हवा त्यांचाच आशीर्वाद आहे? यावर स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यावर योग्य ती कारवाई का करत नाही? सट्टा-मटका अर्थपूर्ण संबंधातून तर सुरू नाही ना?या मुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रशचिन्ह ? उपस्थित केले जात आहे. असे ऐनपूर येथील ग्रामस्थां कडून बोलले जात असून सट्टा-मटका कायम स्वरूपी बंद करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.