ऐनपुर येथील युवकाचा कनिष्ठ अभियंत्यांस निवेदनाद्वारे आन्दोलनाचा इशारा
Monday To Monday NewsNetwork।
ऐनपुर ता रावेर(प्रतिनिधी)। तालुक्यातील ऐनपुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नितिन जैतकर यानी महावितरणाच्या कनिष्ठ अभियंता यांना ऐनपुर येथून खिर्डी या गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या मेन लाइनच्या पोल संदर्भात निवेदनाद्वारे आन्दोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,ऐनपुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नितिन जैतकर यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,ऐनपुर येथील वाल्मीक नगर भागातुन खिर्डी या गावाला विज पुरवठा करण्यात आलेला आहे,त्यातील दोन पोल हे सध्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या ठिकाणी जीवित हानि होऊ शकते याविषयी वारंवार आपणास सूचना देऊनही या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे,तसेच वरील विषयानुसार काम न झाल्यास दिनांक 22 जून रोजी ऐनपुर येथील सबस्टेशन समोर ‘डफडे बजाओ आंदोलन’ करण्यात येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.