रावेर

ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात झाडांची कत्तल….

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १९/०२/२०२२ रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी यांच्या निवास्थाना जवळ असलेल्या बाभळी चे झाड तोडण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या निवास्थानाला लागून एक हिरवे डेरेदार बाभळी चे झाड व एक कोरडे झालेले झाड असून आज दिनांक १९/०२/२०२२ रोजी सकाळी गावातील एका लाकुड तोडणारे माणसांकडून कोरडे (सुकलेले) झाड न तोडता डेरेदार बाभळी चे झाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या संगनमताने तोडण्यात आले या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निरज पाटील यांना आमच्या प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की प्राथमिक आरोग्य केंद्राचे शब्बीर तडवी यांना माहीत आहे त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वित्तीय जबाबदारी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ व्हि.डी.महाजन यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही झाड तोडण्याची परवानगी घेतली आहे परंतु त्यांच्या जवळ आज रोजी कुठलेही लेखी परवानगी मिळून आली नाही आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुट्टी असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी वर काल सही झालेली आहे आम्हाला सोमवारी सही झालेली परवानगी मिळणार आहे असे सांगण्यात आले परंतु स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत कार्यालयातून परवानगी घेणे किंवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांची सहीची परवानगी हातात नसतांना झाड तोडण्याचे काम सुरू केले यात कुठेतरी पाणी मुरतांना दिसत आहे भारत सरकार झाडे लावा झाडे जगवा चा नारा देत आहे येथे सर्रास झाडे तोडून टाकले जात आहे याची रीतसर चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!