डॉक्टर अभावी ऐनपुर येथील पशुवैधकीय दवाखाना बंद अवस्थेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर,प्रतिनिधी। ऐनपुर येथे पशु वैधकीय सरकारी दवाखाना असून बऱ्याचा दिवसा पासुन डॉक्टर नसल्यामुळे पशु वैधकीय दवाखाना बंद आहे त्यामुळे पशु धनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे ,ऐनपुर परिसरात दाहा ते बारा गावे येत असल्यामुळे हा एक महत्त्वाचा पशु वैधकीय दवाखाना असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात लोक बाहेर गावातुन आपले बैल ,म्हैस ,गाय , शेळी यांना घेवून इलाज करण्यासाठी दवाखान्यात येत असतात परंतु दवाखाना बंद असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
बदलत्या हवामानामुळे या जनावरांमध्ये तोडखुरी, लाळ्या खुजगट , पायखुरी, लम्पि स्कीम डीसीज यांसारखे साथीचे संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये उद्भवत आहे . वेळेवर योग्य तो इलाज होत नसल्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता आहे. साथीच्या आजारांमुळे शेतकरी व जनावरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु डॉक्टर नसल्यामुळे व सतत दवाखाना बंद असल्यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता असल्याने कायम दवाखाना सुरु करण्यात यावा अशी मागणी नागरिक व शेतकरी करत आहे.