ऐनपुर येथे पशु वैद्यकीय दवाखाना डॉक्टरविना सुरु,डॉक्टर सतत गैरहजर,पशु धनाचे हाल . . .
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे ,प्रतिनिधी। ऐनपुर येथे श्रेणी एकचा पशु वैद्यकीय दवाखाना आहे परंतु डॉक्टर सतत गैरहजर असल्यामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याकडे शासन लक्ष देईल का? ऐनपूर हे सुमारे नऊ ते दहा हजार लोकसंख्येचे गाव असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे पालन केले जाते. ग्रामीण भाग असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी म्हैस , बैल, गाय , शेळी अशा पशुंचे पालन करतात. बदलत्या हवामानामुळे या जनावरांमध्ये तोंडखुरी , लाळ्या खुजगट , पायखुरी , लम्पि स्कीन डीसीज यासारखे साथीचे संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये उद्भवत आहे. साथीच्या आजारांमुळे शेतकरी व जनावरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आधीच शेतकरी करोना , नापिकी , अवकाळी पाऊस, सातच्या लहरी वातावरणामुळे व शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळे ढबघाईला आला आहे. म्हणून पशुधन वाचवणे आवश्यक झाले आहे. म्हणून पशुधनाचे संवर्धन करून गावात लवकरात लवकर लसीकरण मोहिम राबवावी. तोंडखुरी ‘ पायखुरी , राळ्या खुजगट , लम्पि स्कीन डिसीज या संसर्गजन्य आजारांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फीत पशुचे मोफत लसीकरण करण्यात यावे. परंतु डॉक्टर दवाखान्यात येत नसल्यामुळे पशुधनाचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहे. बऱ्याचशा शेतकर्यांची व नागरिकांची तक्रार आहे की, दवाखान्यात डॉक्टर सतत गैरहजर असतात व फक्त एक शिपाई आणि एक कम्पाउंडर यांच्या भरवश्यावर दवाखाना सुरु आहे. डॉक्टर दवाखान्यात येतील का? शासन याकडे लक्ष देईल का?