ऐनपूर परिसरात वाळूची व खडीची चोरटी वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर ता.रावेर, प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून ऐनपूर सह परिसरात अवैध वाळूची व खडिची चोरटी वाहतूक सुरु आहे . मात्र याकडे महसूल विभाग प्रशासना चे दुर्लक्ष होत असून शासनाचा महसूल बुडत आहे. ऐनपूर गावात महसूल विभागाचे दोन कर्मचारी असल्या वर सुद्धा अवैध वाळू वाहूक जोमात सुरु आहे.अर्थपूर्ण संबंधातून ही अवैध वाहतूक सुरू असून तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे सुद्धा हितसंबंध असल्याचे बोलले जाते.
परिसरातील विविध भागातील सरकारी व खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत त्या अनुसंगाने गेल्या अनेक दिवसापासून परिसरात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर ट्रक, ढम्मपर , ट्रक्टर च्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक होत आहे . सदर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळूचा भार वाहुन आणत असल्याने गावातील व परिसरातील रस्ते देखील खराब झाले आहेत. परिणामी शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल देखील बुडवला जात आहे. वाळूने भरधाव वाहनांमूळे लहान – मोठ्या वाहनांना देखील अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिकांना रात्रीचा प्रवास करताना कठीण झालेले आहे. अवैध वाळू वाहतूकदार ऐनपूर परिसरातील तापी -पूर्णा नदी पात्रातून उत्खनन करून बिंधास्तपणे वाळूची वाहतूक करत आहे. ऐनपूर गावात मंडळ अधिकारी व तलाठी असतांना सुद्धा रात्रीच्या वेळी व दिवसा अवैध वाळूची वाहतूक जोरदार सुरु आहे. या मागे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचीही परिसरात बोलले जात असून महसूल विभाग यांच्याकडे लक्ष देईल का? व वाळू माफियावर कारवाही करेल का?