सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात 100 बालकांना कार्बोव्हॅक्स कोरोना लस
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,विजय के अवसरमल। कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आज 22 मार्च रोजी ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथे व 12 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असलेली कॉर्बेव्हक्स कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला .यावेळी शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीच्या 100 विद्यार्थ्यांना कॉर्बेव्हक्स ही लस देण्यात आली.
ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला आज शाळेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरण साठी 200 लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यातील 40 लस धामोडी येथील हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली. वैद्यकीय विभागाच्यावतीने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लस हीच प्रभावी असल्याचे सांगण्यात आले तिसरा लाटेच्या वेळेस सुद्धा कोरोणा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आपण कोरोनाला थोपवू शकलो.
15 वर्षावरील विद्यार्थ्यांना या अगोदरच लसीकरण करण्यात आलेले आहे. यावेळी लसीकरणासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. खुशबू तडवी, आरोग्य सहाय्यक मधुकर पवार, सी ए पाटील सिस्टर, हरीश पाटील डाटा एंट्री ऑपरेटर, प्रियंका पाटील सिस्टर, प्रीती पाटील, प्रीती आडबाल ,रेखा जैतकर, मीना जैतकर ,भारती पाटील, जयश्री चौधरी, वर्षा अवसरमल इत्यादी आशा वर्कर्स यांचे सहकार्य यावेळी लाभले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक आर. जे. पाटील, उपमुख्याध्यापक एस डी चौधरी, पर्यवेक्षक पी आर महाजन, उपशिक्षक अतुल धंजे , अशरफ तडवी, सोनाली पाटील, उषा पाटील, कोमल पाटील यांचे सुद्धा सहकार्य यावेळेस लाभले.