भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावमहाराष्ट्र

अजिंठा लेणी परिसरात कर्मचाऱ्यांचा प्रताप, दारू पिऊन पर्यटकांना अश्लील शिवीगाळ, पर्यटन विभाग साखर झोपेत..!

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली अजिंठा लेणीत २९ बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने लावला होता. इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक या कालखंडात निर्मिती झालेल्या या लेणी पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. या ठिकाणी प्रशासनानं कर्मचारी नियुक्त केले असून या कर्मचाऱ्यांचा एक वेगळाच प्रताप समोर आला आहे.

जळगाव पासून सुमारे  ४५ किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी आहे.  अजिंठा लेण्या पाहण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन जळगाव आहे. परंतु अजिंठा लेणी ही संभाजीनगर जिल्ह्यात आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा ही लेणी जगभर प्रसिद्ध आहे. या लेणीत २९ बौद्ध लेणी असून या लेणी पाहण्यासाठी भारतासह जगातून पर्यटक येथे येत असतात. येथील सरकारी कर्मचारी हे नेहमीच दारू पिऊन फिरत असतात व पर्यटकांना अश्लील शिवीगाळ करीत असतात. या बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याचं समोर आलं आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी भारतातील अजिंठा लेणीची ओळख आहे.बौद्ध धर्माचा वारसा म्हणून ओळख असलेल्या लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोच्या यादीत आहे. २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा केली होती. त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.

भारतीय संस्कृतीची जगात एक वेगळीच ओळख असताना परदेशी पर्यटकांसमोर दारू पिऊन त्यांना अश्लील शिवीगाळ कारण हे भारतीय संस्कृतीला धब्बा असल्याचं मत पर्यटकांकडून व्यक्त केले जात आहे. परदेशी पर्यटक फिरत असलेल्या ठिकाणी कर्मचारी दारू पिऊन पर्यटकांना अश्लील शिवीगाळ करतानाच व्हिडीओत दिसत आहे. हा असला प्रकार भारतीय संस्कृतीला शोभणारा नसून पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पर्यटन विभाग साखर झोपेत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!