जामनेरसामाजिक

गुरूंचा शब्द पाळल्यामुळे शबरी मातेला झाले श्रीरामांचे दर्शन – श्री श्याम चैतन्यजी महाराज

जामनेर, जि. जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपल्या गुरूंवर असलेली श्रद्धा व निष्ठा, त्यांनी दिलेला शब्द, वचन यांचे तंतोतंत पालन करणाऱ्यांना भगवंताचे दर्शन होते. जसे शबरी मातेला गुरूंनी सांगितले एक दिवस श्रीरामचंद्र भगवान तुला दर्शन देतील आणि तू धन्य होशील.

हा शब्द शबरी मातेने आयुष्यभर पाळला. शबरी माता भिल्ल समाजाची असूनही भगवंतावर तिची निष्ठा होती. या तिच्या अतूटनिष्ठेमुळे श्रीराम प्रभूंनी शबरी मातेला दर्शन दिले. शबरी मातेने चाखून दिलेली उष्ठी बोरे सुद्धा ग्रहण केली. असे श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी गारखेडा खुर्द येथे झालेल्या कोजागिरी पौर्णिमा तसेच शबरी माता जयंती निमित्त रामायणातील विविध दाखले देत उपस्थितांचे प्रबोधन केले .

या कार्यक्रमाला गंगापुरी व गारखेडा येथील समस्त ग्रामस्थ तथा भिल्ल समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. भगवंताची भक्ती करताना जात पात,धर्म, उच नीच, हा भेदभाव बघितला जात नाही. सुसंस्कृत मात्र अशिक्षित असलेल्या भिल्ल समाजावर आज धर्मांतराचे आक्रमण होत आहे. त्या आक्रमणाला आपण बळी पडता कामा नये. शबरी माता अशिक्षित असूनही तिने आपला धर्म सोडला नाही. गुरुंनी सांगितलेला शब्द आयुष्यभर तिने पाळला. अशा शबरी मातेचा आदर्श आपण घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!