रावेर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, ११ जणांना घेतला चावा
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून त्यांनी आतापर्यंत ११ जणांना चावा घेतल्याने जखमी झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात लहान बालकांचा सुद्धा समावेश आहे.
रावेर शहरात यशवंत मावळे. वय २ वर्ष, आस्मिन खान. वय ६ वर्ष.शेख हसन शेख अझहर वय ,४.५ वर्ष., यथार्थ वय ६ वर्ष. शेख रशीद शेख आसिफ वय १२ वर्ष. समर्थ करतार जाधव, वय १० वर्ष. नितीन हरचंद महाजन, वय ३४ वर्ष. आनंद दातत्रय वणी वय ५० वर्ष. अल्ताफ शेख गाफ्फर
वय ३५ वर्ष. मही दिलीप सोनार वय ४.५ वर्ष ,रेहान फारुख खाटीक वय १६ वर्ष. सर्व राहणार रावेर हे ११ जण कुत्र्यांच्या चाव्याने जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यशवंत मावळे हा बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा लागलीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.