सावदा येथील “अलिशाबा” चे ३० रोजे पूर्ण
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील सात वर्षाच्या “अलिशाबा” या मुलीने रमजान चे पूर्ण ३० रोजे पळून अभिमान वाढविला आहे.
“अलिशाबा” ही सावदा येथील संजरी डिजीटल स्टुडिओ संचालक व पत्रकार अजहर खान अजमल खान यांची मुलगी असून अलिशबा खान ही जिल्हा परिषद शाळा सावदा तालुका रावेर येथील इयत्ता (2) दुसरी च्या वर्गात शिक्षण घेत आहे.
अलिशबा खान अजहर खान वयाने फक्त ७ वर्षे असलेल्या मुलीने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून ( उपवास) अवघ्या ७ वर्षाच्या वयापासूनच अल्लाह ची ईबादत नमाज, निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती त लीन होत) करीत तंतोतंत पालन करीत असल्याने सर्वत्र अलिशबा खान चे कौतुक केले जात आहे.
अलिशबा हिने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून धैर्याचे, संयमाचे आणि विश्वासाचे उदाहरण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अलिशबा ही अजमल खानसाहब ट्रान्सपोर्टर (एमपी गुजरात रोडलाईन सावदा) यांची नात आहे.