मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व १५ जागा बिनविरोध !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि मुक्ताईनगर पंचवार्षिक निवडणूक 2023 -2028 साठी संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून संचालक पदाच्या 15 पैकी 15 जागा बिनविरोध झाल्या असुन संपूर्ण संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.
यामध्ये व्यक्तिशः मतदारसंघात
जंगले प्रशांत प्रल्हाद,
बढे चंद्रकांत विनायक,
पाटील निवृत्ती भिका। महिला राखिव गटात–
चौधरी सुरेखा पुंजाजी
झांबरे अलका एकनाथ
इतर मागासवर्गीय मतदारसंघात―
झोपे प्रभाकर सोपान, अनुसूचित जाती मतदारसंघात– भालशंकर प्रशांत (बाळा)प्रभाकर, भटक्या जाती जमाती मतदारसंघात– गोसावी मधुकर रामपुरी
सर्व साधारण सहकारी मतदारसंघात
बढे ज्ञानदेव लक्ष्मण
गव्हाळ शांताराम काशिनाथ
दुट्टे सोपान तुकाराम
पाटील गोपाळ चिंतामण
पाटील नरेंद्र मधुकर
पाटील दत्तू किसन
कपले पुंडलिक शंकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे
माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, मुक्ताई सूतगिरणी चेअरमन रोहिणी खडसे , जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर , सुधाकर पंढरी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे निवडीबद्दल अभिनंदन केले
बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा