सावदा किसान दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत किसान पॅनलचा मोठा विजय
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातील सावदा येथील किसान सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान पॅनलने सर्व १६ जागांवर विजय मिळवत दणदणीत यश संपादन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. पाटील यांनी याबाबत माहिती देत विजेत्यांची नावे जाहीर केली.
सामान्य मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे आहेतः
भंगाळे घनश्याम ओमकारः २९५ मते अच्युत निलेश दिनकरः २५४ मते चौधरी महेश दिनकरः २५१ मते चौधरी लतेश रवींद्रः २५० मते नेमाडे अतुल रामदासः २५० मते चौधरी भोजराज मधुकरः २४८ मते नेमाळे अर्चना अतुलः २४८ मते चौधरी भूषण प्रमोदः २३४ मते जावळे विनोद प्रभाकरः २३३ मते इंगळे रमेश दुलाः २२८ मते येवले रमेश तोतारामः २२४ मते पाटील स्वप्नील सुनीलः २०६ मते येवले दिलीप त्र्यंबकः १०९ मते नेमाडे चैतन्य कुशालः ९१ मते पाटील घनश्याम रामदासः ७९ मते मोहितः २९६ मते (बाद मतदानः ३६)
अविरोध निवडून आलेले उमेदवार ….
इतर मागास वर्गीय : सरोदे अक्षय सुभाष अविरोध, महिला राखीवः चौधरी निलीमा चंद्रकांत, राणे निलीमा संदीप अविरोध, विशेष मागास वर्गी: बैरागी धरमदास नारायण अविरोध.
या निवडणुकीत किसान पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. पाटील यांनी निकाल घोषित केला. या यशामुळे किसान पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.