Kirit Somaiya Viral Video|भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल, राजकारणात खळबळ !
Monday To Monday News Network |
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya Viral Video यांचा आक्षेपार्ह स्थितीतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्यांसारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडिओ व्हायरल होत असल्याने सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तसेच यावर वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत. दरम्यान, सदर आक्षेपार्ह व्हिडिओचे वृत्त ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीवरून प्रसारीत झाले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत थेट पत्रकार परिषदेतच आरोप करणारे किरीट सोमय्या हे आता या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली आहे.
या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या क्लिप खर्या आहेत की मॉर्फ केलेल्या ? याबाबत चौकशीतूनच सत्य समोर येणार आहे. मंडे टू मंडे न्युज या व्हिडिओची पुष्टी करत नाही.