भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मा.आमदार शिरीष चौधरी सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी यास मारहाण केल्याच्या आरोपावरून अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चौपाळे शिवारातील गोडाऊनजवळ वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी,३०, रा. धुळे, यांना सात जणांनी मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.तसेच हा प्रकार मोबाइलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाइल फोडला. यासंदर्भात अमळनेर चे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी,५२ वर्ष, विक्रांत दिलीप मोरे, वय ४४ वर्ष, विशाल मोहन नवले, ४० वर्ष, किरण मनोहरसिंग रघुवंशी, ३८वर्ष, जनक केवलचंद जैन,३५ वर्ष, गौरव प्रकाश चौधरी,३४ वर्ष, प्रशांत चौधरी, ४० वर्ष. यांच्या विरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!