आत्ताची बातमी : पोलीस हवालदारासह खाजगी पँटरला ३० हजाराची लाच भोवली
अमळनेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। पोलीस हवालदारासह खाजगी पँटरला ३० हजाराची लाच घेताना धुळे एसीबी ने रंगेहात अटक केल्याने लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनचा कर्मचारी असून घनश्याम पवार असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असलेल्या अमळनेर येथील व्यावसायिकांचे डपंर सुरू ठेवण्या साठी पोलीस हवालदार घनश्याम पवार यांनी ३० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने धुळे एसीबी कडे तक्रार दाखल केली होती.
आज दि १० जानेवारी बुधवार रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार घनश्याम पवार व खाजगी पंटर ला ३० हजाराची लाच घेताना धुळे एसीबी चे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील ,पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांच्या पथकाने रंगेहात अटक केली.