खिर्डी बु! येथे आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित.अध्यक्ष पदी रवींद्र (भुराभाऊ) कोचुरे
उपाध्यक्ष पदी विनोद जाधव तर सचिव पदी विनायक जहुरे
खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील झालेल्या सर्व समाज बांधव नियोजन समितीच्या बैठकीत यंदा सर्वानुमते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या अध्यक्ष पदी रवींद्र (भुरा भाऊ) कोचुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष पदी विनोद जाधव व सचिव पदी विनायक जहुरे, कोषाध्यक्ष अंकुश जाधव, शुभम कोचुरे, कुंदन कोचुरे, रितेश जाधव, सागर लहासे, निलेश जाधव, नितीन जाधव, करण वाघ, अजय मोरे, संदीप जाधव, अजय जाधव, आशिष जहुरे, गणेश कोचुरे, भूषण अहिरे, ईश्वर जाधव, युवराज जाधव, यांची निवड करण्यात आली.14 एप्रिल रोजी समाज मंदिर येथून त्रिशरण पंचशील घेऊन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सायंकाळी 5.30 वा. शोभायात्रा निघणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.