“जय श्रीराम” च्या घोषणेसह अमोल जावळे यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. हंगामी विधानसभा अध्यक्ष काळिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शपथ घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रावेर मतदारसंघाचे भाजप आमदार अमोल जावळे यांनी चप्पल काढून विनम्रतेने शपथ घेतली, ज्यामुळे त्यांनी आपल्या नम्र वृत्तीचे दर्शन घडवले. शपथविधीनंतर त्यांनी “जय श्रीराम” आणि “जय गोमाता” अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. त्यांच्या या अनोख्या कृतीने सभागृहाचे लक्ष वेधले असून, त्यांची साधी आणि भावनिक शैली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
२०१९ च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे होता, मात्र २०२४ च्या निवडणुकीत अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जावळे यांना एकूण १,१३,६७६ मते मिळाली आहे.