ब्रेकींग : जावळे, बेंडाले, जळकेकर महाराज भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर !
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाकडून जळगाव जिल्ह्यासाठी आज तीन नविन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून यामध्ये तरूण चेहर् यांसह महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवडीची चर्चा होत होती. आज अखेर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी Jalgaon President तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना आधी रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे.