१८ वर्षीय तरुणीला जाबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार
जामनेर, जि. जळगाव. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l १८ वर्षीय तरुणी बाथरूमध्ये अंघोळ करीत असतांना शेजारीच राहणाऱ्या आरोपीने तिला जाबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर घरात अत्याचार केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, २४ जुलै रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १८ वर्षीय तरुणी तिच्या घराच्या बाहेर असणाऱ्या कुडाच्या बाथरूम मध्ये अंघोळ करीत असतांना तरुणीच्या घरामागे राहणारा सुरेश रामदास भिल याने अचानक बाथरूम मध्ये प्रवेश करून पीडितेला उचलून घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिल्यावरून सुरेश भिल याच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहेत.