भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावयावल

नदी पात्रात असलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने यावल येथील प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव /यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वाळू उपसा मुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्या मुळे यावल येथील प्रौढाचा गिरणा नदी मार्गे पत्नीसह जात असताना मृत्यू झाल्याची घटना दि. ४ जानेवारी शनिवार रोजी दुपारी ३ वजेच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, यावल येथील पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) हे एरंडोल तालुक्यातील खर्ची येथून लमांजन येथे नातेवाईकांकडे पत्नीसह गिरणा नदीमार्गे जात असताना नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.

पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) हे पत्नी आशाबाई यांचेसह यावल येथे राहतात. दीड महिन्यापूर्वी दि. २४ नोव्हेंबर रोजी पांडुरंग मराठे यांचा मुलगा मनोज हा जळगावात गणेश कॉलनी परिसरात सेंट्रिंगचे काम करताना पडून मृत्युमुखी पडला होता. दरम्यान, शनिवारी पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांचेसह एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आले होते. तेथून लमांजन येथील नातेवाईक गोकुळ मराठे यांचेकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गिरणा नदी ओलांडत असताना नदीत वाळूउपसामुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले.  पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पांडुरंग मराठे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. डोळ्या समोर च पतीचा मृत्य झाल्याने त्यांच्या पत्नीने मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, गिरणा नदीत वारंवार होणाऱ्या वाळू उपशामुळे खड्डे पडले आहेत. हेच खड्डे लोकांच्या जीवावर उठल्याचे सांगून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!