शिवसेनेत नाराजांची फौज : तानाजी सावंत शिंदेंना धक्का देणारं?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक प्रस्थापितांना जोरदार धक्का देण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेनेचे तानाजी सावंत, विजय शिवतारे , प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार, राजेंद्र गावित, यांचा समावेश आहे.यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
नाराज आमदारांची समजूत काढण्याचा पक्ष स्तरावर प्रयत्न सुरु असतानाच मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मात्र कमालीचे नाराज आहेत. तानाजी सावंत यांनी फेसबुक तसेच आपल्या इतर समाजमाध्यमांवरुन धनुष्यबाण हे पक्ष चिन्हं हटवलं आहे. इतक्यावरच न थांबता सावंतांनी सूचक पद्धतीने बंडाचा इशारा दिला आहे.
पूर्वी तानाजी सावंत यांच्या फेसबुक प्रोफाइलवर धनुष्यबाण चिन्हासहीत स्वत:ची ओळख, ‘मंत्री, सर्वाजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री धाराशिव जिल्हा’ अशी ठेवण्यात आली होती.
मात्र मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर तानाजी सावंतांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील स्वत:च्या फोटोसहीत इंट्रोही बदलला आहे. तानाजी सावंतांनी स्वत:च्या फोटोऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो प्रोफाइल इमेज म्हणून लावला असून कव्हर फोटोवर बाळासाहेबांच्या फोटोसहीत, ‘शिवसैनिक’ असं लिहिलेला फोटो ठेवला आहे.
तानाजी सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले नेते मानले जातात. तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळेल असा शब्द शिंदेंनी दिली होती अशी आता चर्चा आहे.
शिंदे सरकारच्या कार्यकाळातील सुमार कामगिरीमुळे तानाजी सावंतांना भाजपाच्या दबावामुळे यंदा मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता सावंत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे
त्याच बरोबर तानाजी सावंत, दिपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडे, अब्दुल सत्तार ,राजेंद्र गावित मंत्रिपदं न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजांची फैज उभी राहिली आहे, शिवसेनेच्या मतब्बरानी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.या नाराजांची एकनाथ शिंदे याने डोकेदुखी ठरणार आहेत. आता शिंदे यांची कशी समजूत काढतात, त्यांना यात यश मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा